STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

जागच्या जागी

जागच्या जागी

1 min
28.2K


गर गर गर फिरणारा पंखा

स्तब्ध आहे जागच्या जागी 

खुर्च्या आतल्या खाली खाली 

एकाकी झालीय आताशा खोली

माणसे घरातली नाही एका जागी 

अनेक होती त्यांची झाली पांगा पांगी

उजाड भकास होऊन बसले कसे 

आता हे भरले घर जागच्या जागी

हश्या -टाळया,मुक्त ते बागडणे 

सुख -दु:खाच्या आठवणी झाल्या 

मावळतीच्या जणू गर्द - सावल्या 

जुने दिवस थिजले जागच्या जागी

सांभाळता येत नाही संचित अन 

मोल त्याचे कधी उमजत नाही 

वेळ होतो पसार हळूच मांजर-पावली 

ओघळते अश्रू तसेच जागच्या जागी ...!


Rate this content
Log in