STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

जादूगर

जादूगर

1 min
458


मैदानात जमली मुले

जादूची भरली शाळा

ऐटीत आला जादूगर

कोट अंगात काळा


डोक्यावरती टोपी

भलीमोठी दाढी

टोपीखालून जादूने

वस्तू मजेच्या काढी


सारखा सारखा बडबडे

जादूमंतर जादूमंतर

पोत्यामध्ये घाली कोणा

क्षणात करी छूमंतर


हात रिकामे बंद करी

जादूने काढी हाती नोट

पत्त्यांची गंमत दाखवी

जादूवाले त्याचे बोट


जादूच्या पाहून करामती

आम्ही थक्क झालो

आ वासून जादूमध्ये

सारेच हरवून गेलो


मनी आला विचार

आम्हालाही जादू यावी

जादूच्या छडीने काढू

वस्तू जी पण हवी


जादू म्हणजे हातचलाखी

जादूगर सांगे जादूतंत्र

आम्हा मुलांना आवडला बुवा

छुमंतरवाला सोपा मंत्र!!!



Rate this content
Log in