STORYMIRROR

Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

इवलीशी पावले

इवलीशी पावले

1 min
12K

इवल्याशा पावलांनी तुझे आगमन झाले

येताक्षणीच तू आमचे विश्व व्यापून टाकले


तुझी चाहूल लागणे हे किती सुखद होते

तुझे प्रत्यक्षात येणे हे त्याहून सुंदर होते


तुझे प्रत्येक हावभाव हे किती लोभसवाणे

तुझे गोड हास्य म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे


तुच मला दिलीस आई म्हणून ओळख नवी

तुझी मात्र माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही


तुझ्या सोबतच माझ्या मधील आई देखील मोठी होतेय

तुझ्याकडून बरच काही शिकताना आयुष्य नव्याने उलगडतेय


Rate this content
Log in