STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

2  

Dinesh Kamble

Others

इलेक्शन आल हो इलेक्शन आल

इलेक्शन आल हो इलेक्शन आल

1 min
1.0K


इलेक्शन आल हो इलेक्शन आल.

एरवी एसीत बसणार नेते लोक

पांढऱ्या बगळ्यावानी चमकणारे लोक

आता गावाच्या वेशीत जमा झाल. .

इलेक्शन आल हो इलेक्शन आल.


गावातली कोवळी निबर लेकरे

लागली बिल्ले खिशाला मिरवू

टोळ्याच्या टोळ्या बेरोजगाराच्या

लागल्यात एकमेकांची जिरवू..


गाव कस आता आलबेल झाल..

इलेक्शन आल हो इलेक्शन आल.


तालुक्याला होऊ लागल्या

ताई , दादाच्या सभा मोठमोठाल्या..

फुकटचे जेवण , फुकटचा प्रवास.

फुकटची रिचवायला गड्याभरून चालल्या ..


चार दिसात सारे मतदार झालेत खुशाल.

इलेक्शन आल हो इलेक्शन आल.


एकाच गल्लीतले मित्र होते जे दोघे

आता दोन पक्षाचे झेंडे मिरवत फिरतात..

ज्यांनी कधी आई बापाचा केला नाही जयघोष

इतक्या घोषणा ते आता नेत्याच्या नावाने करतात...


लाडाने वाढवलेल लेकरु इतकं बदलल..

इलेक्शन आल हो इलेक्शन आलं


Rate this content
Log in