II तो एक मित्र II
II तो एक मित्र II


मराठी शाळेतून सुरु झाला आमचा प्रवास एकत्रित
थांबला हाच सोळाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत
एकत्र खेळलो, बागडलो, केल्या मारामाऱ्या
अभ्यासात मात्र सर्व संमतीने केल्या एकमेकांच्या उऱ्या-दुऱ्या
असेच भेटत राहिलो सर्वजण अधून मधून
कार्यक्रमांच्या निमित्ताने तर कधी आठवणी काढून
स्नेह-मेळाव्यासाठी भेटलो बत्तीस वर्षांनी बांधून सेतू मैत्रीचा
आणि पुन्हा निर्माण झाला उजाळा आठवणींचा
त्याच्या अतिशय सुंदर भाषणाने मन जिकंली सर्वांची
अर्थात हिरहिरीने साथ दिली पूर्ण कार्यक्रमांच्या नियोजनाची
ग्रुपवर सामाजिक आणि धार्मिक मेसेजची रेलचेल असायची
सवय त्यांनी लावली होती एकमेकांच्या मनात घर करायची
पण थांबवले हे सर्व आयुष्याच्या अर्धवट वाटेवर आणि केली खात्री
जगाचा निरोप घेऊन आजच सोडली त्याने सर्वांची अर्धवट मैत्री