STORYMIRROR

Aarya S

Children Stories Comedy Children

4  

Aarya S

Children Stories Comedy Children

हत्तोबाची सर्कस

हत्तोबाची सर्कस

1 min
312

हत्तोबाने ठरवलं

सर्कस करायची,

त्यासाठी मित्रांची

सभा भरवायची.


सभेसाठी गोळा

झाले सगळे मित्र,

हत्तोबाने माईक घेऊन

सांभाळले सूत्र.


कोणी कोणी आता

करायचे काय काय,

माकड म्हणाले“उलटी उडी

मारली तर चालेल काय”


मासा म्हणाला

“दाखवीन पोहून,

खारुताई तू दाखव

शेपूट फुगवून”.


सभेला आले होते

चार चार ससे,

तयार झाले बिचारे

कसे बसे.


स्पर्धा आता आम्ही

कासवाशी लावू,

यावेळी कासवाला

हरवून दावू.


विदूषक होईन

म्हणाला कुत्रा,

चेंडू उडवून

दाखवीन सतरा.


वाघोबा म्हणाले हातात

छडी घेऊन येईन,

सगळ्यांना छान

ट्रेनिंग देईन.


अश्या या सर्कशीची

तयारी झाली,

सगळ्या मित्रांनी

धमाल केली.


पण या सर्कशीला

प्रेक्षकच नाय,

बघायला तुम्ही सगळे

येणार काय?


Rate this content
Log in