STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

3  

Nalanda Wankhede

Others

हरवलेली माणुसकी

हरवलेली माणुसकी

1 min
1.8K




पिशाच्च बनून एकमेकांच्या उरावर

काळाबाजार माणसांचा भरलाय

लाल रक्ताने माखला माणूस तरी

जाती धर्माला कवटाळून बसलाय


समाजाचं सौहार्द संपुष्टात आलंय

बेरोजगारीच्या वादळांन नैराश्यात लोटलं


श्वास थांबवणाऱ्या कृत्यांनी

कौर्याची सीमा गाठली

हिंस्त्र क्रूर म्हणणाऱ्या श्वापदांनी

बघा रावं माणुसकी वाटली


पराकोटीचा स्वार्थीपणा,

वर्चस्वाचं चिकटलेलं बांडगुळ

खोटी अस्मिता, खोटा अहंकार,जहरी प्रतिष्ठा

संशयीत लाटांचे धुरावर धूर,

जगाल कशे, जगण्याचं माजते काहूर


दुबळ्यांच्या कत्तली सर्रास

महागाईला चढला माज

अट्टल गुन्हेगार चढवून साज


माणुसकीचा करतो विनाश

जातीभेदाने पोखरली मने

अंतर्बाह्य जीवाची घालमेल झाली

घालून जाती जातीची कवचकुंडले

व्यवस्थेची नासाडी झाली


अपराध्यांना पाठीशी घालते प्रशासन

लोकशाही नक्षलवादी झाली

विकले गेले पैश्यापोटी

निगरगट्ट दगडांची संवेदना झाली


स्त्री कधी भोगवस्तू झाली कळलेच नाही

नितीमूल्यांचा ऱ्हास कधी झाला उमगलेच नाही

अंगा अंगातून उफाळतात वासनेच्या ज्वाला

माणुसकी कधी हरवली समजलेच नाही


बोकाळली कट्टर धर्मांधता

जातिवादामुळे झाली संसाराची होळी

चिमुरड्यावरच्या पाशवी बलात्काराने

शरमेने मान खाली घालते बंदुकीची गोळी


दाबलेले हुंदके, दाटलेले अश्रु

निरपराध जीवानां न्याय हा मिळेल काय ??

माणसाने माणसाला अजून तरी ओळखले काय ??

भुकेपोटी जीव जातो, माणुसकी धाब्यावर बसवली काय ?


अंधाधुंद प्रतिस्पर्धेत माणूस जिंकला पण माणुसकी हरली काय ?

वर्तमान एवढे काळेकुट्ट

भविष्य किती भयावह असेल

माणसांचा कर्दनकाळ

कदाचित हरवलेली माणुसकीच असेल


माणूस जातीचे संरक्षण कराया

माणुसकीचा धर्म आणू अस्तित्वात

हरवलेल्या माणुसकीला

घालू जन्माला पुन्हा वास्तव्यात


नालंदा वानखेड़े

नागपुर






Rate this content
Log in