हजेरी...!!
हजेरी...!!
हजेरि..अर्थात...Attendance.....!!!
खूप दिवसापूर्वीच दुखणं
आज इतक्या वर्षांनी डोकं वर काढतय
आम्हाला त्याच नवल कुठं वाटतय?
भोग भोगला आम्ही त्या
पाचवीस पूजल्या गुरू जनांचा
आता कोठे, त्या वेळेचं मोल कळतंय
तारुण्याच्या उभारणीची वर्ष
सारी या मस्तवालांनी खाल्ली
जाता जाता उडवून आमची खिल्ली
शिव्या शाप अन राग होता मनी
पण भामट्या नादी लागणे नको
कधीच ऐकवला नाही तक्रार इको
सहनशीलतेचा अंगी ओढून सदरा
झाकले सारे ओढून पदरा
तेंव्हा कोठे त्यांच्या जन्मली माया उदरा
सुटलो एकदाचे ग्रहण काळाचे सरता
उरलो नुसता वाटले जगण्या पुरता
खरेच पटले मला तोच करता धरता पाठीराखा
आता भाग्य आमचेही फळफळले
नशिबाने सारे आम्हा हवे ते दिले
वाटले गेले ते दिन गेले बरे झाले
आज ही मला आठवते ती हजेरी
नशिबात आली होती दावण्या माजोरी
पण मी ही केली तिच्यावरी शीरजोरी
दाखविला इंगा इमानदारीचा
शून्यातून बाहेर येता येता मग
हसलो मनसोक्त डिग्री घेता घेता .....!
