हिरव्या भेटी
हिरव्या भेटी
1 min
82
पावसाळी रम्य पहाटे
भटकताना नदीकाठी
भूतकाळात मन शिरते
स्मरतात हिरव्या भेटी।।१।।
इंद्रधनूच्या सप्तरंगात
रंगल्या संसार गोष्टी
घेतलेल्या आणाभाका
स्मरणात हिरव्या भेटी।।२।।
भान जगाचे विसरुनी
रमलो आगळ्या विश्वात
समय कसा संपून गेला
नकळत तेव्हा आली रात।।३।।
मिलन झाले दोन जीवांचे
मोर मनाचा मनात नाचे
चन्द्र नभातून डोकावतो
आगमन होते तारकांचे।।४।।
परतले घरट्यात पक्षी
सूर्य गेला मावळतीला
हात हातातून सोडता
जीव येतो काकुळतीला।।५।।