ही वाट दूर जाते ...
ही वाट दूर जाते ...
1 min
254
थकल्या भागल्या जीवाची
सहचारिणी होते अन
अविरत अवाढव्य पसरत जाते
ही वाट दूर जाते ...
त्या डोंगर माथ्यावरती...
डावी - उजवी झुकते कधी
स्वछंदी नागमोडी होते
ही वाट दूर जाते ...
कात टाकलेल्या नागिणीसारखं
सळसळते ... नित्य नेमाने
भूल - भूलैया , चक्रव्यूह होऊनि
ही वाट दूर जाते ..
पांथस्थ कुणी असो
कृष्ण हो या सुदामा
सुहास्य पायघड्या होते
ही वाट दूर जाते ..
मस्त कलंदर हरपंन मौला
बघून ती हरकते खिदळते
बघून अस्वत्थामा हळहळते
ही वाट दूर जाते ..
