STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

ही रात्र चांदण्यांची

ही रात्र चांदण्यांची

1 min
12.2K


ही रात्र चांदण्याची 

तुझ्या नि माझ्या नात्याची

झुळूक मंद वाऱ्याची

लागे ओढ अनामी

तुझ्या स्वप्नात सहवासाची


ही रात्र चांदण्याची

तुझ्या नि माझ्या नात्याची

लख्ख लखं त्या काजव्यांची

मला येई बेहोशी ती

तुझ्या स्मित हास्याची


ही रात्र चांदण्यांची

तुझ्या नि माझ्या नात्याची

कुजबुज रातकिड्यांची

वेडी मग मी मनाशी

तुझ्या अवीट स्वरांनी


ही रात्र चांदण्याची

तुझ्या नि माझ्या नात्याची

दरवळ सुगंध फुलांची

तुझ्या निरागस प्रीतीने

बेधुंद मी स्वतःशी 

बेधुंद मी स्वतःशी


Rate this content
Log in