STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

हॅपी बर्थ डे...!

हॅपी बर्थ डे...!

1 min
772


हॅपी बर्थ डे...!


जरा आडवा पडलो

कानावर शब्द आले

हॅपी बर्थ डे टू यू.....

हॅपी बर्थ डे टू यू....


पाठोपाठ

हसण्या खिदळण्याचा आवाज

वाजवी अवाजवी सूचनांचा आवाज

हुर्ये हुर्ये नंतर केक काप केक काप

मेणबत्ती विजव मेणबत्ती विजव

फुक मार फुक मार

आणि मग एकच गलका


क्रीम घे क्रीम घे

धर धर फास फास

अबे तोंडाला तोंडाला

अंडी काढ अंडी काढ

नको नको नको बे

सारा गोंधळ


फट फट अंडी फुटल्याचा आवाज

सार सहन शिलतेच्या पलीकडचे

आनंदाची परिभाषा

बदलली की काय ..?

हे सारं

रस्त्यावरच चाललेल

थोड्या वेळाने

एकच शब्द कानी आला


आणि वाईट वाटले

तो इतकंच म्हणाला

झक मारली

आणि वाढदिवस साजरा केला..


बस आता यापुढे

वाढ दिवस नाही साजरा करायचा

इतक्यात एक मित्र म्हणाला

वाढ दिवस

दुसऱ्याला आंनद देण्यासाठी असतो

हे मित्रांना कुठं कळत रे.?


तू नको नाराज होऊ

हे घे पाणी आणि

रागा सकट सार धुवून टाक

हॅपी बर्थ डे लेका...!


तो हसला

आणि त्यानं सार सार

धुवून टाकलं बरं वाटलं

एक तरी पाठीराखा

त्याला आज मिळाला...!


आणि

आवाज शमला

नवीन दिवस सुरू झाला...!


Rate this content
Log in