STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

2  

Nalanda Wankhede

Others

हे रंग जीवनाचे

हे रंग जीवनाचे

1 min
647


जीवनाच्या रंगमंचावर

उधळती सगळेच रंग

कुणी भिजतो गडद रंगात

कुणाचे राहती कोरडे अंग


बालपणाची सावली

तारुण्यावर पडत नाही

पहाता पहाता येते वार्धक्य

रंग जीवनाचे सारखेच रहात नाही


भिजतो चिंब आनंदात कधी

कधी वाहतात नद्या अश्रूंच्या

दुःखाची पांघरतो चादर कधी

कधी धारा दुधाळ मधुचंद्राच्या


ऊन तिथे सावली असणारचं

कलेकलेने बदलतात चंद्राच्या कळ्या

दुःखासोबत सुख उमलणारचं

कष्टाने मावळतात जीवनाच्या अवकळा


जीवन आहे एक संघर्ष

स्वार्थत्याग हा अनमोल ठेवा

सदविचार बाळगून अंगी

जीवनाच्या चाखू मेवा


संतुलित असावा जगण्याचा छंद

प्रेमभावानी जिंकू हृदय सर्वांचे

साहाय्य करून एकमेकांना

शिल्पकार आपणाचं आपल्या जीवनाचे


Rate this content
Log in