STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

3  

SURYAKANT MAJALKAR

Others

हे महादेवा...!

हे महादेवा...!

1 min
15.3K


रौद्ररुप तुझे, तांडव भारी

मनास भावे ध्यानस्थ मुद्राही

काय चिंतीशी हे महादेवा

नमन चरणी, मजला पावा (१)


तुला भजण्या महाशिवरात्र

लिंगस्वरूप पुजति सर्वत्र

का प्राशिती 'भांग' मात्र

हे महादेवा... (२)


त्रिशुल, डमरु, माथा सोम

अंगि भस्म, कैलास धाम

'सोमरस नावे का बदनाम

हे महादेवा...(३)


त्रिदेवातील प्रलंयकारी

उघड त्रि-नेत्रास हे त्रिपुरारी

सोळा सोमवार भजते कुमारी

हे महादेवा... (४)


आदी-अंतना देवांस कळले

भोलेबाबा भक्तांवरी भाळले

'विष' पाप्यांचे प्राशिता जळले

'निलकंठ' नामे प्रसिद्ध झाले (५)


मुखी नामे 'राम' आळवितो

'रावण' भक्तीस प्रसन्न होतो

'हनुमंत' स्वरुपी सहाय्य होतो

तुज लिलेस प्रणाम महादेवा

नमन चरणी, मजला पावा (६)


गळ्यात तुझिया सर्प रेंगाळे

तुज आळविती तान्ही बाळे

धाव सत्वरी, तुची सांभाळे

या दुनियेचा भार एकला

नमन चरणी, मजला पावा (७)


Rate this content
Log in