STORYMIRROR

Murari Deshpande

Others

3  

Murari Deshpande

Others

*हे लोकहिताचे युध्द*

*हे लोकहिताचे युध्द*

1 min
453


मी लिहितो अक्षर जे जे

ते हृदयामधून उमटे

टोमणा म्हणे कुणी याला

कुणी कोपरखळी वा चिमटे !


मज विसंगतीचा राग

मी अन्यायावर चिडतो

मग लेखणीस ये धार

मी आवेशाने लढतो


हा लढा किती वर्षांचा

मज ठाऊक नाही नक्की

पण खिंड लढविणे आहे

खुणगाठ मनाशी पक्की


जी मनात तुमच्या खदखद

ती करता आली व्यक्त

समजेल धन्य मी मजला

तुमच्याच ऋणातून मुक्त


ही ताकद तुमची सारी

मी आहे निमित्तमात्र

तुमच्याच मुळे मी लिहितो

वैऱ्याची जरी हि रात्र


घ्या चला लेखण्या हाती

अन लिहा चला रे स्पष्ट

नक्कीच सूर्य ,उगवेल

अंधार करू या नष्ट


अन अंधाराला आता

कणभरी भ्यायचे नाही

हे वाण सतीचे आहे

गाफील व्हायचे नाही


हे लोकहिताचे युध्द

हे शब्दांचे विस्फोट

द्या तिलांजली मौनाला

मोकळे करा रे ओठ!

****************


Rate this content
Log in