हे देवा सूर्य नारायणा
हे देवा सूर्य नारायणा
1 min
167
हे सूर्यनारायणा नमन तुला
तूच नारायण, तूच दिनकर ,🌅
तूच रवीकर, तूच भास्कर
नमन तुला देवा नमन तुला
दिलेस जीवन तू सकलांना 🌅
दीनानाथा तू प्रभाकरा
जगत चालक तू सविता पावक
तूच विश्वनाथ तूच आदिनाथ
सकल करती तुझी पूजा 🌄
वंदन तुज हे नारायण
न मानसी तू सानथोर
समदृष्टी तुझी सकलजनांवर
राहो निरंतर हे नारायण 🌅
तुझे येणे सर्वाना प्रेरणा देणे
करती नमन कार्याक्रमण 🌅
आठवती तुज मनोमनी
प्रार्थती तुज नित्यनिरंतर 🌅
नमन तुज हे नारायण
🌅🌄🌅🌄🌅🌄🌅🌄
