STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

हा आम्हा भारतीयांचा धर्म

हा आम्हा भारतीयांचा धर्म

1 min
14.3K


भक्तीभाव मनी ठेवुनी 

श्रद्धापूर्वक अंत:करणाने

करावे आपले नित्य कर्म 

शिकवण देतो आपुला धर्म ...!

स्वरूप याचे अतिविशाल 

व्यापुनी आहे समाजमन 

सहिष्णुता आहे याचे वर्म 

मनामना प्रिय आहे धर्म ..!

विश्वभरात धर्माला आहे

मोठे मनाचे हो स्थान 

गौरावन्वित होतो आम्ही 

ओळख देशाची हिंदुस्थान ...!

करावे सकल कर्म सदाची 

अपेक्षा कर्म-फळाची नको 

पिढ्या -दर -पिढ्या संस्कार 

करितो हाच आपला धर्म ...!

ज्ञानयोगी ,थोर थोर ते

ज्यांनी घडविला श्रेष्ठ धर्म

कीर्ती पताका घेउनी सांगू 

हा आम्हा भारतीयांचा धर्म ..!


Rate this content
Log in