गुरूतुल्य मातापित्यांना प्रणाम
गुरूतुल्य मातापित्यांना प्रणाम


आयुष्याच्या वाटेवर आई वडील शिक्षक गुरू
दिसते आहे खाचखळग्यांची वाट, बोट त्यांचे धरू
दाखवतात ते जीवनाचा योग्य मार्ग प्रगती
आपण करायची, दिसतो आपोआप स्वर्ग
जरी पडले चुकीने चुकीचे पाउल अपराध घालतात पोटीपाठीवर
मायेचा हात, कर चांगले काम हे शब्द गुरूंच्या ओठी
अनेक असता समोर वाटा, सांगणे त्यांचे निवडा एक वाट
झालो आपण यशस्वी, गुरूंचा करा थाट
कणभर नाही स्वार्थ, अपेक्षा त्यांना नाही
असेल स्वर्गसुख भोगायचे, गुरूचरण सदैव पाही
गुरूंचे मन हे मोकळे अंगण घालू त्यांना मनापासून लोटांगण ॥