गुरूमहिमा
गुरूमहिमा
1 min
16.9K
काय पुसता मजसी
गुरु म्हणावे कुणास
देतो आकार आम्हाला
उद्धारितो जीवनास
गुरु महिमा जपावा
नित्य हृदयात हा असा
आचरणी आपल्याच
उमटावा त्यांचा ठसा
कुंभ अमृताचा सारा
रिता करी गुरुजन
शब्द वेचावे सारेच
व्हावे चरणात लिन
स्वर्गसुख असे काय
संग गुरुचा लाभता
सार्थ जीवनच सारे
वर गुरुचा मिळता
