गुरुंचे आभार
गुरुंचे आभार
शिक्षक हे महान गुरू दिसतील जेव्हां त्यांचे पाय धरू
त्यांचे मन एक मोकळे अंगण त्रिवार करू त्यांना वंदन
शिक्षक खरेच श्रद्धास्थान बालपणी ते वळवता मन
काही मुलं असतात आचरटकरतात दंगामस्ती छडीचा तो धाक दाखवुन नकळत खेळायला शिकवतात व्यायाम कुस्ती
हातात छडी, मिशीत हासू डोळे वटारणे, रुप मिस्कील बोबडे बोल असता अशुद्ध शिकवितात ते बोल शुद्ध
बालगीतांच्या चालीवर डोलतो वर्ग हळूहळू शिकवू लागतात विषय सर्व
इंग्रजी गणिताची लावता गोडी भुगोल इतिहासाची जमवितात जोडी
थोडा वेळ चित्रात भरावयाला सांगतात रंग चित्रात रंग भरता भरता मुलं होतात दंग
बालपणी घडवितात संस्कार गाथा शिवाजी झाशी सांगतात शुरविरांच्या कथा
शिक्षकच घडवितात पुढचे उज्वल भविष्य कोणी डॉक्टर कोणी शिक्षक झाले कानावर पडता चेहर्यावर खुलते मधुर हास्य॥