गुरु माझी आई
गुरु माझी आई
1 min
37
आयुष्याला शिकवणच वळण लावते
आपल्याला आई ही पहिली गुरु लाभते
जी कुंभाराप्रमाणे आपल्याला आकार देते
आपल्या बोबड्या बोलण्याला स्प्ष्ट बोलणे करते
चिऊ माऊ काऊ ची ओळख करून देते
इवल्याश्या पायांना चालायला शिकवते
इवल्याशा बोटाना पकडून लिहिण्याचा श्री गणेश करते
चांगल्या संस्कारचा रंग चढवते
पोटच्या गोळ्याला एक सुंदर व्यक्तीमत्वाची मूर्ती घडवते
अश्या या गुरु पौर्णिमा दिनी
झुकले माझे हात माझ्या आईच्या चरणी
