गुंतता मन
गुंतता मन
1 min
26.1K
गुंतता मन रे झाले स्तब्ध
स्तब्ध होऊनी पाहते तुला,
आस लागली मजला तुझी
तुझी नजर शोधते मला.
गुंतता मन स्वप्नात तुझ्या
तुझ्या भेटीस झाले आतूर,
आठवणीत गेले रमून
रमून जाते जरी तू दूर.
गुंतता मन तुझ्यात सख्या
सख्या उमलून गेली प्रित,
प्रेमळ नात्याचा गोड मळा
मळा फुलव होऊनी मित.
गुंतता मन प्रितीत सख्या
सख्या बहरला रे संसार,
सुख दु:खांची जीवन नौका
नौका संगतीने करु पार.
गुंतता मन हे संसारात
संसारात अर्पिले अस्तित्व,
प्रेमाने जिंकले विश्वासाला
विश्वासाला असते महत्व.
