STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

गुंतता हृदय हे...

गुंतता हृदय हे...

1 min
53

फुलमाला कोवळी सुगंध, तुझ्या ओंजळीत सांडे

वाटे एक कळी त्यातली, मी हाती धरावी


आयुष्यात उद्या जेव्हा दिसणार नाही वाटा

अनोळखी त्या वाटेवर मज साथ तुझी असावी


गर्दीत तुला तुझ्या सौंदर्याच्या, शोधेन मी जेव्हा

पापणी तुझी मला पाहता, एका क्षणासाठी झुकावी


हरवेन जेव्हा तुझ्या नयनांतल्या, सागरात डुंबताना

नजर तुझी काळजात माझ्या कट्यार होऊन रुतावी


रंगांत उतरत्या सांजेच्या, तूही बाहूंत असशील माझ्या

उतरून किरणे पश्चिमेस, ती कातरवेळ सरावी


घेतील सूर गप्पा आपल्या प्रहरांत त्या सरकत्या

रात्र पाहुणी आपल्यासह, स्वप्नांत आपल्या रमावी


केसांत तुझ्या सुगंधी, विसरेन मी स्वतःला

आस पुन्हा जागृतीची, दूर कोठे विरावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance