गुढी पाडवा
गुढी पाडवा
सण हा मराठी नव वर्षाचा
नव्या उमेदीचा नव्या संकल्पांचा.......
उभारूनी गुढी राष्ट्रसेवेची
घ्या जवाबदारी समाजहिताची........
मिळुनी सारे लढूय ह्या भयाण करोनाशी
दाखवून देऊ जगाला आपली ही एकी........
झाले जरी देऊळ बंद घरातच करू सर्व मिळुनी परमार्थ
वर्षोनवर्षी बिघडलेली नाती करूया आता आपण दुरुस्त..
जरी निघाली नाही शोभा यात्रा
परी संकट निवारल्यावर काढू आपण विजय यात्रा....
ठेवूया संयम ,पाळूया नियम
जनतेसाठी झटणाऱ्या शासनाला मिळुनी देऊ समर्थन....
सतत भारवाहणाऱ्या अवनीला देऊ जरा विश्रांती
सरकारच्या आदेशानुसार पाळू आपण संचारबंदी......
हे ही दिवस जातील मनी ठेवा हा विश्वास
येतील पुन्हा दिवस सुखाचे करू मग नव्याने शुभ आरंभ..