STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

गुढी पाडवा

गुढी पाडवा

1 min
2.1K


होळीत जाळूनी हेवेदावे

संपवली धुलवड व्देषाची

प्रेम रंगांची खेळूनी पंचमी

गुढी उभारली नव आशेची


उगवली आज नवी प्रभात

घेवून आली मराठी वर्ष

दारात उभी ही गुढी स्वागता

मराठी मनात ओसंडता हर्ष


सोसली पानगळ तरुतरुंनी

शिशीराने केली जरी दशा

वसंत आला निसर्ग फुलवित

चैत्रपालवीने नटली नवी उषा


नवे संकल्प मराठी मनांचे

नव्या वर्षी मनामनात बांधू

नाते तुमचे आमचे अतूट हे

आपूलकीच्या धाग्यानी सांधू


मनाच्या द्वारी उभारुया गुढी

रोज करेल जी स्वागत आपले

नको निमित्त ते सणावाराचेच

माणुसकीचे बंध मनात जपले


शुभ गुढीपाडवा प्रियजनांनो

मंगलमय तुम्हास मराठी वर्ष

सरोत सारे दुःखाचे क्षण नि

आयुष्या लाभो सुखाचाच स्पर्श




Rate this content
Log in