ग्रंथ आमुचे मनोरंजनगुरु
ग्रंथ आमुचे मनोरंजनगुरु


ग्रंथ आमुचे गुरु हे ग्रंथ आमुचे गुरु
वाचन, चिंतन, मनन करावे
नंतर लेखन सुरू!
ज्ञानाचे भांडार उघडले
ग्रंथ वाचणे जीवन घडले
स्रोत बुद्धीचे मनी वाहती अज्ञाना विसरू(१)
पुस्तकातून दडले ज्ञान
मनोरंजनाची ही आहे खाण
उगीच कशाला गप्पा टप्पा
त्याहून वाचन करू(२)
अफाट आहे ग्रंथ संपदा
विषयांचीही त्यातील विविधा
प्रगल्भता अन् संस्काराची
वाट सुगम ही धरू(३)
वाचन संस्कृती आहे लोपत
पडली पुस्तके अश्रू गाळीत
मोल न त्यांचे कमी व्हायचे
हे ही नका विसरु(४)
लेखक वाचक यांचे नाते
अतूट आणि अभंग असते
वाचन कृती सदोदित ते
असती पापभिरू(५)
ग्रंथ पुस्तके अमोल ठेवा
सुरक्षित अन् वाढत जावा
सुख-दुःख हे मित्र जाणिती
ग्रंथच कल्पतरू(६)