गरीबी
गरीबी
1 min
30.3K
आग गरीबीला लागे
नाही कोणाचे रे कोणी
टीचभर पोटासाठी
काम करे बैलावाणी ।।
दिसे काळे निळे ढग
येतो हुरुप आईला
गाडी ओढता ओढता
काटा रुततो पायाला ।।
आस बांधून पोटाला
पुन्हा लागतो कामाला
कळकळत्या उन्हात
बाप पुसतो घामाला ।।
चाक फसता मातीत
येई पोटात रे कळं
बाई बोले नवऱ्याला
कोन्ह्या पापाचं हे फळं ।।
उनं वाऱ्याच्या संगती
नित करतो रे मस्ती
कष्ट काबाड करुन
करे माती संगे दोस्ती ।।
