STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

गरिबीचा संसार

गरिबीचा संसार

1 min
545


।। गरिबीचा संसार ।।


आम्ही फिरस्ते भटके

गावोगाव भटकतो

काम हाताला मिळते

तिथे मुक्काम ठोकतो ।।१।।


तिथे मांडतो संसार

काळ्या आईच्या कुशीत

ऊन, पाऊस, वादळ

डोई झेलतो खुशीत ।।२।।


वर आभाळाचे छत

बाजू क्षितीजाच्या भिंती

बाप आकाशी बैसला

विंचू सापाची ना भीती ।।३।।


खाट गोधड्या कपडे

घोंगडीही काठीवर

असा संसार, बिऱ्हाड

विंचवाचे पाठीवर ।।४।।


बाळ सानुले काखेत

दूध माऊली पाजते

गाय बाजूला प्रेमाने

कशी वासरू चाटते ।।५।।


असं गरीबीचं जीणं

जरी आलं वाटणीस

देई बरकत देवा

भाकरीस चटणीस ।।६।।


Rate this content
Log in