ग्रहण सुटलं!
ग्रहण सुटलं!
दान धर्मानी ग्रहण सुटलं
रविवार उगवला भाग्याचा
लक्षात राहील सदा वाटते
हा आजचा सूर्योदय कायमचा
मागितला मी एक डोळा
सारे झाले लगेच गोळा
तोंडात सारला मौनाचा बोळा
म्हणे तुला काय कळते बाळा
मी झालो क्षणात ध्रुव बाळ
वाटले येईल धावून आता काळ
अजून जुडली आहे म्हंटल नाळ
ध्येयाचा पेटला होता पोटात जाळ
धीर धरला तप जप केले
उपवास ही बेमालूम झाले
परमेश्वराचे लक्षात आले
त्याने मग वरदान दिले
खूप आनंद झाला बाबा
मनावरचा सुटत होता ताबा
सांगत होते माझे आबा
ध्येयासाठी निष्ट्येने राबा
पटलं मला सार काही
पुन्हा मी काही मागितलं नाही
माझं काही अडलं नाही
तो पण दिल्या वाचून राहिला नाही
त्यानं इतकं दिल की
एकाच दोन डोळ झालं
डोळ्याचं पारणं फिटलं
खरच देवा नशिबाच ग्रहण सुटलं ...!!!
