ग्रहण साफल्य!
ग्रहण साफल्य!
राज्य काय बदललं
सार जणू विश्वच बदललं
नवनवीन घडू लागलं
नवनवीन कळू लागलं
ऋतू काय, ग्रहण काय
माणस काय, सत्ता काय
सार आलबेल होतं
आणि आता सारच वेगळं
प्रत्येक योग
अगदी कपिलाशष्टी सारखा
अगदी नवखा
तसाच बऱ्याच काला नंतर येणारा
नाही म्हणायला
ते त्यांचं येण जाण
आपल्या नित्य क्रमानच
पण आता अप्रूप वाटणार
आज काय सूर्य
अगदी जवळ आला
अंगाची लाही लाही
बऱ्याच गॅप नंतर हा योग
आज काय तर
ग्रहण योग्य सुपर मुन
ब्लु मुन काय म्हणायच
तर नुसतं सून सून
ऐकावं ते सारं नवलच
कधी न घडल्या सारख
आणि या धरतीवर
जगायचं आम्ही परक्या सारखं
असो काही काळ का
असेना थोडी ज्ञानात भर पडते
आणि या कलीयुगात
नवं काही तरी शिकल्याची भूक भागते
आजच्या ग्रहणाच तसच आहे
कधी नव्हे ते पाहायला मिळणार आहे
डोळ्याचं पारणं फीटणार आहे
आजचा दिवसच झक्क जाणार आहे
दे दान सुटे गिराण
ललकारी ऐकू येणार आहे
मी माझा राग सारा देणार आहे
बदल्यात सौख्य समाधान
शांती देवा कडून घेणार आहे....!!!\
