गोठलेली वचने
गोठलेली वचने
भावनिक स्पर्शाला आणि खडीसाखरेच्या गोडीला हरखून जाऊ नका
नाही कोणीच तुमचे इथे तुमच्याशिवाय
आपलेचं आहेत सर्व समजून घेऊ नका
गडद तम् इथे जरी तारका चांदण्या अंगणात दिसल्या
विश्वात कुणाच्या गुंतून पूर्णतः जाऊ नका
अश्रूंच्या पावसात स्वतः बघा पाऊसचं भिजला
करा हुंदक्यानो जागा मोकळी मनाला दाटून येऊ देऊ नका
कोण आपले कोण परके, समजण्या पलीकडली भूमिका
जुळणे जिथे अवघड , जुळवून घेऊ नका
बिंबविले खोटेनाटे हृद्यपटलावर, काट्यांच्या सरणावर झोपलेत इथे
बोलून टाका मनातले, मनातच मना जाळू नका
रित्या करा भावना कुठेतरी बोलून
उगाच कचरा डोक्यात भरू नका
अपेक्षेच्या ओझ्याने होतो डोईचा चुराडा
अनावश्यक वचनांनी गोठून जाऊ नका
भोंदूपणाचा भरलाय बाजार इथे
वांझोटी ही विकासधारा
वाजणाऱ्या खुळखुळ्याला भुरळून जाऊ नका
