गोगलगाय
गोगलगाय
1 min
28.3K
गोगलगाय ही चढली फुलावर चाखायला मकरंद
हळू हळू चढते,चाखते, घेतसे जीवनातला आनंद
फुलाच्या सौंदर्याने तिलाही भुरळ घातली बहुधा
दांडीचा आधार घेऊनिया धरला मार्ग तिने साधा
पाठीवर सदनिका स्वतःची सदैव घेऊन फिरतसे
कळत नाही चालतांना हे सारे सांभाळते ती कसे?
हळू हळू ती मार्ग चालते गंतव्य स्थळी पोहचते
छोट्या कृतीतून मोठा संदेश माणसाला ती देते
मऊ मऊ अंगास तिच्या द्रव एक चिकटसा असे
त्यामुळेच बहुधा चालण्यास तिला सोपे जात असावे
सर्व काही मिळूनही माणूस सदैव रडत राहतो
बघ छोटासा हा गरीब प्राणी किती मजेत राहतो
