STORYMIRROR

Prashant Kadam

Others

2.7  

Prashant Kadam

Others

गणपती आले !!

गणपती आले !!

1 min
15.3K


आले रे आले गणपती आले

ऊंदरावरती बैसोनी आले

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ति मोरया

स्वागत तुमचं घरात आमच्या

गणपती बाप्पा मोरया


वक्रतुंड हे रूप मनोहर

एकदंत जरी सुरेख सुंदर

विशाल कर्ण तरी बाळी बरोबर

नाजूक नेत्रांवरी मध्येच सिंदूर

विराजमान हे झाले लंबोदर


आले रे आले गणपती आले

ऊंदरावरती बैसोनी आले

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ति मोरया

स्वागत तुमचं घरात आमच्या

गणपती बाप्पा मोरया


कटी पितांबर शेला भरजरी

अलंकार सुवर्ण लेवून अंगावरी

हाती मोदक, लाडु बरोबरी

घेवूनी तांब्र फुलांचे हार अंगावरी

विराजमान झाली लंबोदर स्वारी


आले रे आले गणपती आले

ऊंदरावरती बैसोनी आले

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ति मोरया

स्वागत तुमचं घरात आमच्या

गणपती बाप्पा मोरया


दुर्वांसह फुलांनी मखर सजले

समईत मंद दिवे लागले

कर्पुर धुपारतीचे गंध विहरले

टाळं मृदुंग ही घुमु लागले

विराजमान लंबोदर हे झाले


आले रे आले गणपती आले

ऊंदरावरती बैसोनी आले

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ति मोरया

स्वागत तुमचं घरात आमच्या

गणपती बाप्पा मोरया


Rate this content
Log in