गमतीदार गणित
गमतीदार गणित
1 min
11.3K
एक दोन, एक दोन
खेळायला येतं कोण
काळू,बाळू,मीठू,विठू
सांडू,पांडू आणि द्रोण
तीन चार तीन चार
सवंगडी झाले फार
खेळ खेळावयासाठी
जागेची हो मारामार
पाच सहा पाच सहा
रांगेत सारे उभे रहा
अंक सारे मोजू लागा
एक दोन नऊ दहा
सात आठ सात आठ
उजळणी झाली पाठ
पाऊस आला जोराचा
नदी भरली काठोकाठ
नऊ दहा नऊ दहा
सायंकाळ झाली पहा
गमतीदार गणिताचा
खेळ किती रंगला अहा