STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

गझल

गझल

1 min
11.8K

दोघांत आपुले ते ..बोलून खूप झाले

दुःखावल्या मनाला.. त्रासून खूप झाले


आकाश आज माझे..सारे रितेच आहे

तारे नभातले ते..तोडून खूप झाले


दोघात आपुल्या ते..कोणी किती पहावे

दोघांमधील अंतर.. मोजून खूप झाले


सांगू अता कुणाला काही मला कळेना

नशिबात काय आहे..मापून खूप झाले


पाषाण हृदयी तू..जाणून मीच आहे

आता नको दुरावा.. मागून खूप झाले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन