STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

गझल आनंदकंद

गझल आनंदकंद

1 min
11.7K

तरही 

आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा

(स्वप्नात आठवांचा पाऊस फार झाला)

दुःखात आसवांचा देहास मार झाला


भोळ्या अशा मनाला.. आघात पेलवेना

सांगू कुणास आता.. तो खोल वार झाला


मोकाट आज वारा.. घोंगावुनी निघाला

त्याचाच त्रास मजला.. आताच फार झाला


त्रागा करून जेव्हा.. गेला सखा अचानक

दुःखी मनास माझ्या.. मोठा प्रहार झाला


गावात काम नाही.. लोकांत मान नाही

शहरात मात्र जाण्या तो ही तयार झाला..


Rate this content
Log in