आनंद
आनंद

1 min

128
झाला पुरे आजवरचा खटाटोप भविष्याचा
सुखे कालची निराळी आठवू आज थोडी
टाकून बंध मागे, साठलेल्या भावनांचे
मैफिल एक गीतांची, मांडू उगाच थोडी
थांबेल वेळ जेव्हा तुझ्या, डोळ्यांत पाहता मी
गुंतून तुझ्या केसांत सुगंधी, घालवू रात्र थोडी
का असावे प्रवासात पुढल्या, ओझे गतकाळाचे
निर्माल्ये आठवणींची, सोडू पाण्यात थोडी
गप्पांत मिसळून आपल्या, सरकेल पश्चिमेस किनारा
घेऊ ती निसटणारी, वेळ ओंजळीत थोडी
सरेल पुस्तक सारे लिहून, गझला आनंदाच्या
परमेश्वराकडे मागू आयुष्याची, पाने उधार थोडी