STORYMIRROR

Swati Damle

Others

3  

Swati Damle

Others

'घुसखोरी '

'घुसखोरी '

1 min
446


इंचाइंचाने लढवित होते

ग बाई मी गर्दीशी झोंबत होते

ग बाई मी गाडीशी झोंबत होते : धृ.:


चहुबाजूने भिडती अंगा

शिस्तीच्या नसती हो रांगा

एकमेकांना ढकलित होते हो ढकलीत होते : 1:


कुणी मागूनी केला हल्ला

भुईसपाट कुणी हो झाला

तरी चढाई ढिली ना होते हो ढिली ना होते : 2 :


कशा घामाच्या फुटल्या धारा

कुठुनसा येई ना वारा

रेटारेटीत घुसमट होते हो घुसमट होते : 3 :


गुदमरूनी ओढिला श्वास

कसा मानेला बसला फास

कासाविसी जीवाची होते ,जीवाची होते : 4 :


इतुक्यात वाजला हाॅर्न

गर्दीचा वाढला फाॅर्म

घुसखोरी निकाली होते,निकाली होते : 5 :


Rate this content
Log in