घन बरसले सुखाचे
घन बरसले सुखाचे
1 min
103
धरा भेगाळली होती, दाणा सारा संपला,
पाणवठ्याच्या हृदयी,ओलेपणा ही सरला!
चारा कसा गऊला, दुध नसे आचळी,
डोळ्यांना वेध आता, लक्ष लागे आभाळी!
मळभ दाटल्या नभी, मेघ आले ओथंबून
वारा सुसाट सुटला, दामिनी चमके गर्जून!
हर्ष पसरला दिशांत, क्षण विरले दुःखाचे,
तृप्त झाली वसुंधरा, घन बरसले सुखाचे!
