घन भरता आकाशी
घन भरता आकाशी


घन भरता आकाशी उठती मनी वादळे.
येती गालावरी आसू होता अभाल मोकळे.
सोनचाफा फुलला हा, कुडा, केवडा, कर्दल.
रंग फुलले पानात आत गंधाचा दरवळ.
ह्याच शेतांच्या कडेने धुंद होऊन हिंडलो.
रंग बावऱ्या रानात रंगी प्रितीच्या रंगलो.
लाल मातीच्या वाटा ना आली लाली ते मेंदीची. &nb
sp;
चिखलात शोधिते मी खूण तुझ्या पावलांची.
मंत्रमुग्ध रान वारे गंधवेडी गार हवा.
देतो दु:खास डागण्या रानी घुमणारा पावा.
दिसे बांधावर कधी मला नागोबाची फणी.
तुझा हात नाही पाठी फक्त तुझ्या आठवणी.
भूक तहान जलीत करायची वणवण.
स्वप्न हिन घ्यावी नीज आणि घालवावा शिन.
रोप रोप लाविताना लाखदा स्मरते तुला
सुगी परी येशील का तू एकवार भेटायला.