घाव
घाव
1 min
236
घाव टाकीचे दगडा
मूर्ती बनते देवाची
उष्ण लोखंडा ते अस्त्र
असे किमया घावांची.
मनावर घाव मात्र
देई दुःखाचे कारण
प्रत्येकाचे ते कोमल
नाही तयाला तारण.
शेतकरी राबे शेती
जिवापाड कष्ट करी
अति वृष्टिने नासाडी
घाव जिव्हारी तो धरी.
मायबाप देवरुपी
गोड शब्दी द्यावा मान
नको कटू शब्द तया
ज्यांनी होई अपमान.
घाव शब्दांचा टोचुनी
मन होई फार दुःखी
अलवार गोड शब्द
ठेवी त्यांना सदा सुखी.
