घात
घात


असा घात कसा झाला
कशी काळाची किमया झाली
रंगबेरंगी दुनियेला कुणाची नजर लागली
कुणी केला तिचा घात कसा हरवला नाथ
असा घात कसा झाला कसे बंद सगळे झाले
रस्ते सूने केले कसे मंदिर मोकळे
दिसे ना त्यात लेकरे
असा घात कसा झाला
माणूस कसा दुखावला
थोडी पैशाची चणचण
आता लागली खिशाला
असा घात कसा झाला
माणूस सोचती हो झळा
प्राणी पक्षी ती स्वच्छंदी
फिरती मोकळ्या आभाळा
असा घात कसा झाला
माणूस कसा तो पेटला
इतक्या दिवसांनी परत
भाऊ भावाला भेटला
असा घात कसा झाला
पैशविना सुख शांती समजला
गरिबांना दान करी
आता माणूस म्हणती त्याला
असा घात कसा झाला
माणूस मुकला जीवाला
जरी मुकला जीवाला तरी
शिकला जगण्याची शाळा
अ
सा घात कसा झाला
देव मंदिरात राहिला
घरोघरी जातो तोही
डॉक्टर म्हणती हो त्याला
असा घात कसा झाला
लोक मारती हो त्याला
तुमच्या साठी जीव ओलीस
त्याला म्हणती महाराष्ट्र पोलीस.
असा घात कसा झाला
जीव कासावीस झाला
सगळे घरात बसून
शेतकरी दादा माझा राखण मळ्याला
असा घात कसा झाला
कुणी पैसा कमावला
दूध लेकरांना पुरविले
वंदन त्या कामधेनु ला
असा घात कसा झाला
झाला माणुसकीचा जन्म
मुला भेटतो तो बाप
आई दिसते तन्ह्याला
असा घात जरी झाला
निसरगसौंदर्याने आसमंत नटला
विश्वास तो देतो आम्हा
येतो दिवस परतुनी रे बाळा
असा घात जरी झाला
राखू निसर्गाच्या त्या कला
आपली जागा धरती नाही
खरी देवाची शृंखला
अप जागा धरती नाही
खरी देवाची शृंखला........