Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

5.0  

Savita Kale

Others

गड किल्ले

गड किल्ले

1 min
259


गड किल्ले हेचि राज्य

शोभून दिसे हे स्वराज्य

नयने पाही जेव्हा त्यांना

इतिहास आठवे पुन्हा पुन्हा।।


जिजाऊपोटी शिवबा जन्मला

शिवनेरी किल्ल्यावर

बालपण सारे शिवबाचे

घेतले अंगा-खांद्यावर।।


लेऊन तोरण स्वराज्याचे

तोरणागड सजला

दिमाखात हा सिंधुदुर्ग

सागरी उभा राहिला।।


सिंहासारख्या तानाजीच्या

रक्ताने पावन कोंढाणा

सिंहगड म्हणती त्यास सारे

जागवी मराठी बाणा।।


पराक्रम अन् शौर्याचे

गड किल्ले हे साक्षी असती

पाऊल ठेवता त्या मातीवर

अंगी संचारे नवशक्ती।।


स्वराज्याचे करूनी रक्षण

शत्रूला केला प्रवेश कठीण

सा-यांचे गड आकर्षण

महाराष्ट्राची असे ही शान।।



Rate this content
Log in