STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

गड आला सिंह गेला

गड आला सिंह गेला

1 min
28.6K


काळाच्या पडद्याआड होते घडले

स्वराज्याची मंहतीत जडले

शूर शिवरायांच्या सैन्याचा ताफा

नाही कुणी त्यांना अडले...


कोंढाणा स्वराज्यात पुन्हा यावा

ही राजमाता जिजाऊची ईच्छा

शिवरायाची मग वाढली आशा

न प्रयत्न करता कशी होईल ईच्छा...


योजनाचा आखला मग बेत

करण्यात सर कोंढाणा आता

संदेश पाठवला तानाजीस

मुलांच्या लग्न व्यस्त तानाजी आता


संदेश महाराजांचा मिळता उद्दगारले असे

आदी लग्न कोंढाणा नंतर रायबाचे

मर्द मराठा तो एकच होता वेगळा

सर करायास चालली तानाजीची सैन्या


अचानक केला हल्ला तुटून पडला

वैऱ्यावर मर्दमावळा भारी पडला

समोर येणाऱ्याला बोले त्यांची तलवार

वैरी धारातीर्थी होता मग पडला..


लढाई होईन घायळ तानाजी लढला

मरेपर्यंत तो होता लढला

गड आला पण सिंह गेला

असे माझा राजा हो त्यावेळी वदला


Rate this content
Log in