गच्ची
गच्ची

1 min

32
चार बंद भिंतींमधला हा खुला आसमंत.
गच्ची नावाचा हा खरा स्वछंद.
आकाश तिथे भेटीस येई, पक्षी गोड गीत गायी.
फुललेला लाल गुलाब आणि मोगऱ्याचा धुंद सुगंध. चांदण्या रात्री चंद्र तारे डोकावून पाहती.
हळुवार वाहती धुंद वारे.
बहरलेला रम्य तो गुलमोहर आणि दूरचा तो डोंगर मन मुग्ध करे.