गौरी फुगडी गीत
गौरी फुगडी गीत


तिढा बाई तिढा, हाताचा वेढा, घालू या,
चला सख्यांनो, झिम्मा, फुगडी खेळू या||धृ||
केळी बाई केळी, शिकरणाला, आल्या बाई साऱ्या, जागरणाला,
देवीला तुझी माझी पहिली फुगडी देऊ या,चला सख्यांनो, झिम्मा फुगडी खेळू या||१||
बस फुगडी, पाय लंगडी, तवा, फिंगरी, घालू वाकडी, नाकी नथ, गळी ठुशी,
कानी बुगडी लेवू या,चला सख्यांनो, झिम्मा फुगडी खेळू या||२||
(उखाणा) पाट बाई पाट, चंदनाचा पाट, गौरीमाईला वाढू चांदीचे ताट, आज, नटून, थटून,
रेशमी लुगडी नेसु या,
चला सख्यांनो, झिम्मा फुगडी खेळू या||३||
(उखाणा) सासूबाईची लाडकी मी लाडकी, सोसवेना तिला दोडकी ती दोडकी, माहेरला जाते सांगून,
तिची बुगडी घेऊ या, चला सख्यांनो, झिम्मा फुगडी खेळू या||४||
(उखाणा) चांदण बाई चांदण, पिठुर चांदण, माझ्या अंगणात, देवाचं आंदण,
तव्यात भाकर, देवासाठी उघडी ठेवू या, चला सख्यांनो, झिम्मा फुगडी खेळू या||५||
दंड फुगडी माझी आवडती, लाटणं फुगडी तुझी नावडती, भारताच्या नारी,
सायबाची पगडी उडवू या, चला सख्यांनो, झिम्मा फुगडी खेळू या||६||