STORYMIRROR

Prashant Shinde

Others

1.0  

Prashant Shinde

Others

गैरसमज...!

गैरसमज...!

1 min
961


गैर समज...!

गैर समज हा असा रोग बाबा

त्यावरी कोणाचा नसे ताबा

थेट गाठतो अंतराचा गाभा

भरते जिथे विचारांची मय सभा


भूल भुलैया असा पाहुनी

मन उद्विग्न होते

संदिग्ध विचारांनी पुन्हा ते

असे कासावीस होते


गैर समाजाचे नाव एक दुसरे

संशय त्याशी म्हणतात सारे

ज्याशी उपचार नसे या जगती

रुतवे काटा सलाचा तो खोल अती


वेळीच उपचार करावा स्वतःच

वेळ न दवडता हो आत्ताच

संशय दूर करता सुख अपरंपार

चालतो सुखाने जीवनी संसार


मृगजळास पाहुनी धावणे

नको कधी जीवनात

असावा स्नेह धागा सदैव मनात

ऋणानुबंध राखण्या जनात


पहा आजमावून एकवार

सद्विवेकाची उगारून तलवार

पळेल संशय सारा तालेवार

जुळते नाते स्नेहाचे पुन्हा एकवार....!


Rate this content
Log in