STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

गावची नाळ

गावची नाळ

1 min
11.8K

डोंगर एकीकडे नदी मधोमध आहे

माझ्या ओतूर ची महती,

माझ्या कपलदिकेश्र्वरची पण काय ती शान

बारा गावात माझ्या देवाला खूप मान , 

यात्रा सगळ्या राहुनी गेल्या

नयनी फक्त निराशा उरल्या

अशी केली या कोरोंना ने घाण,


गावची ती ओढ 

म्हणे पाखरांचा थवा

कोण्या एका झाडाखाली

तान्ह्या बाळाला झोपवा


माझ्या गावची ती माया

देती धरित्रीची छाया

गुण गोविंदांच्या चारा

भरला आहे त्यांच्या ठाया.


माझी गावची ती नाळ

जन्मोजन्मी मला हवी

शेना , मातीचा तो वास

येवो माझ्या अंगी मनी


दिला वासराला घास तिथे

घरातली आई

तिच्या लेकरा प्रमाणे 

जीव ओवाळून जाई.......

तिच्या लेकरा प्रमाणे

जीव ओवाळून जाई........


Rate this content
Log in