गाऱ्हाणे
गाऱ्हाणे


आज गुलामी अशी संपली, असा जाहलो मुक्त.
आयुष्याच्या या वळणावर, धडा गिरवते शिस्त.
कोनी सवईने कोनी काळजीने, कोनी मजबूरीने जपतोय.
निसर्गाचे शत्रू बनलो, आज निसर्गच हसतोय.
बसलाय तो तोऱ्यात, रुबाबदार देखणं रूप घेऊन.
विश्वास आपल्याला बसत नाही, रुपड त्याच पाहून.
अचानक कोंडी झाली, आणी असा दुरावा आला.
काळ थोडा वाईट होता, सगळे संकट देऊन गेला.
थांबलो टिकलो आणी लढ्लो, दोघेही निकराने.
विधात्यालाही ऐकावे लागले, आपल्या दोघांचे गाऱ्हाणे.
प्रार्थना ती खरी, आज सार्थकी लागत आहे.
सगळ ठीक होईल, फक्त थोडा वेळ मागत आहे.