STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

गाणे गातो सदा तुझे

गाणे गातो सदा तुझे

1 min
13.9K


नशीबवान झालो मी लाभता सहवास तुझा 

गाणे गातो सदा तुझे, हा रसिक चाहता तुझा ।।

मनात असतेस तू ,विचारही असतो तुझा 

नसतेस सोबत तू , असे समोर फोटो तुझा  ||

सोबत असती पाखरे आठवणींची माझ्या 

लाभावा अशावेळी लोभस सहवास तुझा ||

बंध रेशमांचे जडता नाते सुंदर उमलले

बघ हे जगही आता सुंदर दिसू लागले ||

प्रेरक आहेस तू माझी ,अन मी भक्त तुझा 

गाणे गातो सदा तुझे, हा रसिक चाहता तुझा ।।


Rate this content
Log in